पालकाची भाजी करूयात म्हंटल्यावर 'woww / मस्तच / धम्माल /माझी आवडती ' अशी प्रतिक्रिया अभावानेच. मोठे [ वयाने ] झाल्याशिवाय काही भाज्यांची गोडी कळतच नाही . त्यापैकीच पालक एक . अगदी लहान नुकत्याच भात खाऊ लागलेल्या बाळाच्या भातात सर्वप्रथम ज्या भाज्यांचा नंबर लागतो त्यातील पालक एक असूनही नंतर नावडत्या भाज्यांमध्ये त्याचे नाव कसे समाविष्ट होते कळतच नाही .पालक खरेतर खूप धम्माल भाजी , पालक-पनीर , पालक-पुरी , पालक-पराठा ,पालक-डोसा ,पालक-भजी , ई. प्रचंड आवडीचे पदार्थ पालकाच्या नावावर असून देखील पालक आवडत्या भाज्यांच्या रांगेत पहिल्या पाचात कधीच नसतो . पण मला खात्री आहे , आजच्या आपल्या पाककृती पालकाला ते मानाचे स्थान नक्कीच मिळवून देतील .
पालकची भाजी : नं १
पालक १ जुडी
मुगाची डाळ अर्धी वाटी
टोमेटो अर्धा
मिरच्या ४
लसूण ४ पाकळ्या
आले एक छोटा तुकडा
मीठ दीड चमचा [आवडी प्रमाणे ]
फोडणीसाठी : तेल 2 चमचे ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई.
पालक धुवून ,निवडून ,चिरून घेणे .मुगाची डाळ धुवून चिरलेल्या पालकात एकत्र करून कुकर मध्ये शिजवून घेणे .शिजवल्यावर चांगले घोटून घेणे .
कढईत तेल टाकून ,गरम करून ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई टाकून फोडणी करून घेणे ,फोडणीत शिजवलेला पालक व मुगाचे घोटलेले मिश्रण टाकणे .गरम पाणी टाकून मिश्रण थोडे सैलसर करुन घेणे . त्यात लसूण ,मिरची ,आले मिरची कटर मधून काढून टाकणे .टोमेटो बारीक चिरून वरून टाकणे . मीठ टाकून भाजीला मंद आचेवर उकळी आणावी .
------------------------------------------------------------------------------------------------------------
पालक भाजी: नं 2
साहित्य
पालक १ जुडी
डाळीचे पीठ पाव वाटी
ताक १ वाटी
लसूण ६ पाकळ्या
मिरच्या ६
[फोडणीचे साहित्य वरीलप्रमाणे ]
पालक धुवून ,निवडून ,चिरून , शिजवून घेणे. शिजवलेल्या पालकात डाळीचे पीठ घालून चांगले घोटून घेणे .
काढईत तेल टाकून .मोहोरी ,बारीक चिरलेल्या मिरच्या , सोलून बारीक चिरलेला लसूण टाकणे ,लसूण गुलाबीसर चोकलेटी रंगाचा झाला कि त्यात हळद ,हिंग घालून ताक व पालकाचे घोटलेले मिश्रण टाकावे .मीठ घालून उकळी आणावी .

पालकाची भाजी : नं ३
सांगायला एकदम सोप्पी 'आळूच्या भाजीप्रमाणे करावी '...... पण आळूची भाजीच येत नसेल [माझ्यासारखे ] त्यांच्यासाठी कृती देत आहे .
साहित्य :
पालक १ जुडी
डाळीचे पीठ पाव वाटी
मिरच्या ६
कडीपत्ता ४ पाने
गुळ १ चमचा भरून [पोह्याचा चमचा ]
चिंचेचा कोळ २ चमचे घट्टसर
शेंगदाणे मुठ भर [भिजवलेले]
खोबर्याचे पात्तळ लहान काप
काळा [गोडा] मसाला १ चमचा
फोडणीसाठी : तेल 2 चमचे ,मोहोरी ,हिंग ,हळद ,कडीपत्त्याची पाने 4 , ई.
पालक धुवून ,निवडून ,चिरून , शिजवून ,डाळीचे पीठ घालून चांगला घोटून घेणे .काढईत तेल टाकून .मोहोरी ,बारीक चिरलेल्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, हळद ,हिंग घालून पालकाचे घोटलेले मिश्रण टाकावे .थोडे पाणी टाकून सरभरीत करून घ्यावे . वरून गुळ ,चिंचेचा कोळ ,भिजवलेले दाणे ,खोबर्याचे काप ,मीठ आणि १ चमचा काळा [गोडा] मसाला घालून उकळी आणणे .
[टीप : पालकांच्या पाना ऐवजी आळूची पाने वापरली की झाली आळूची भाजी तय्यार .]

पालकाची [सुकी] भाजी : नं ४
पालकाची जुडी १
उकडलेले बटाटे २
मिरच्या ४
फोडणीसाठी : तेल १ चमचा ,मोहोरी ,हिंग ,हळद ,ई.
पालक धुवून ,निवडून ,चिरून घेणे. फोडणीसाठी गरम कढईत तेल ,मोहोरी , हळद ,हिंग ,ई घालून त्यात पालक व बारीक चिरलेला उकडलेला बटाटा व मीठ घालून ,पाणी आटेपर्यन्त मंद आचेवर शिजवणे . [पालकाला आपलेच पाणी सुटते ,वरून घालू नये]. डब्यात देण्यासाठी मस्त भाजी .
टीप ; लक्षात ठेवण्यासारखे काही .....
पालकाला मीठ इतर भाज्यांपेक्षा कमी लागते .
लसूण गावठी ,आकाराने लहान असेल तर, ४-६ पाकल्यां ऐवजी एक अख्खा लसूण घ्यावा .
मिरच्या कमी तिखट असतील तर ,दिलेल्या प्रमाणापेक्षा २ ते ३ मिरच्या [आवडीप्रमाणे] जास्त घ्याव्यात .
- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

No comments:
Post a Comment