Saturday, 15 February 2014

नमन [नमनाला घडाभर (?) तेल ]

नमस्कार ,
स्वयपाक् घराशी बरेचदा संबंध लग्न ठरल्यावरच येतो ,एक वेळेचा स्वायापाकापासून साधारण सुरवात होते . तेल किती घेऊ ? मोहोरी किती ?  हळद -मिठाचे प्रमाण करता करता खिचडी , पोहे ,कोशिंबीर , बटाटा भाजी ,साबुदाणा खिचडी , कणिक भिजवण्याची सर्कस , प्रचंड प्रयत्न पूर्वक केलेली  गोल (?) पोळी वर येऊन गाडी रेंगाळते आणि अचानक 'हम भी किसीसे कम  नाही ' चा साक्षात्कार होतो .
नव्या नवलाईचे नउ दिवस संपताना पाय जमिनीला लागतात आणि अक्षरश: त्रेधातीरपिट उडते . अनेक विचार न केलेल्या गोष्टी पोटात गोळा आणतात .जसे विरजण कसे घालायचे ? साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचे ? इ. दिवसातून दोन ते तीन फोन आईला सुरु होतात . इतके करूनही फजिती ती होतेच .
हि सर्व हत्यारे आधीच उपलब्ध असतील तर कामाचा आणि फोन चा वेळ नक्कीच वाचवता आला असता .
माझ्या आई च्या अशाच सोप्प्या , चविष्ट आणि साधारण रोज लागणाऱ्या  पाककृती देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच तुमच्या घरी होणारया  सुंदर , सुग्रास पदार्थांचे देखील इथे स्वागत आहे .

 एका सोप्या पाककृतीने सुरवात करूयात .
लिंबाचे गोड लोणचे : [उपवासाला चालते ]
दहा लिंब [मोठी]
दोन वाट्या साखर
एक चमचा तिखट
दीड चमचा मीठ
 [आमटीची वाटी ,पोह्याचा चमचा मापाला ]

लिंबाच्या चार-चार  फोडी करून एका स्वश्च बरणीत भराव्यात ,त्यात मीठ ,तिखट ,साखर घालून चांगले हलवून ,झाकण घट्ट लावून ठेवावे .रोज एकदा सर्व मिश्रण हलवावे .दहा दिवसात लिंबाचे चविष्ट लोणचे तय्यार . :)

No comments:

Post a Comment