लिम्बाचे लोणचे तयार झाले , सरबताची पण सगळी तयारी झाली परंतू लोणचे खाणार कशाबरोबर ? पौष्टिक आणि चमचमीत , करायला सोप्पे असे कटलेट आज पाहुयात . जास्त तेलकट पण नाहीत ,घरात लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडणारे कटलेट बनवणे पण सोप्पे आणि सुटसुटीत .
साहित्य :
२ उकडलेले बटाटे
अर्धा बीट [किसलेला]
एक मोठे गजर / २ छोटे गाजर [किसलेले]
अर्धा छोटा कोबी [किसलेला]
मटार [ मिक्सर मध्ये जाडसर करून घेणे ]
४ ब्रेड च्या स्लाईस [मिक्सर मध्ये बारीक करून घेणे]
४ लसणाच्या पाकळ्या ,४ कमी तिखट मिरच्या आणि कोथिंबीर [ एकत्र वाटून घेणे ]
१ छोटा चमचा मीठ [चवीप्रमाणे ]
१ डाव तेल
ब्रेडचा थोडा चुरा बाजूला काढून बाकी सर्व सामान उकडलेल्या बटाट्या मध्ये एकत्र मळून घेणे . ह्या सारणाचे छोटे छोटे गोल करून ठेवणे . एका सपाट ताटात ब्रेडचा थोडा चुरा घेऊन त्यावर ह्या गोलांना अलगद थापून कटलेटचा आकार देऊन fry pan मध्ये थोडेसे तेल टाकून मंद आचेवर शेकून घेणे .शेकत असताना झाकण ठेवले तरी चालते .दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शेकले की झाले आपले कटलेट तय्यार . कटलेट बरोबर हिरवी चटणी , चिंचेची चटणी पण छान लागते .
नुसते कटलेट तर छान लागतातच परंतु घरात गोल burger चा ब्रेड असेल तर मधोमध कापून दोन्ही बाजूला आतल्या बाजूने चटणी , butter लावून एका भागावर कटलेट ठेऊन कांदा , टोमेटो , बीट चे काप ठेऊन दुसरा अर्धा भाग वरून बंद करून मस्त घरगुती burger तयार होते .
चवीला सुंदर ,करायला सोप्पे आणि गाजर ,बीट, कोबी , मटार सारख्या पौष्टिक भाज्याही बिनबोभाट पोटात जाणार . अजून काय हवे ?
- सौ पुष्पा हेरंब आवटी (माझी आई)

No comments:
Post a Comment